डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठलीये. मंगळवारी शेअर बाजार उघडल्यावर 1 डॉलर 80 रुपयांच्या वर गेला. या वर्षी डॉलरच्या तुलनेत रुपया 7 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. अमेरिकन चलनाने युरोला मागे टाकल्याने भविष्यातही रुपयामध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते, असं म्हटलं जातंय. सर्वात मजबूत चलन झालेल्या या डॉलरबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात..